१. इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा. अ ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा . १) आधुनिक इतिहास लेखनाचा जनक ………. यास म्हणता येईल . ( अ ) व्हॉल्टेअर ( ब ) रेने देकार्त ( क ) लिओपोल्ड रांके ( ड ) कार्ल मार्क्स उत्तर :- आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हाॅल्टेअर यास म्हणता येईल . २) 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ ……… याने लिहिला . ( अ ) कार्ल मार्क्स ( ब ) मायकेल फुको ( क ) लुसिआँ फेबर ( ड ) व्हॉल्टेअर उत्तर :- 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला . ( ब ) पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा . ( १ ) जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल - रिझन इन हिस्टरी ( २ ) लिओपॉल्ड व्हॉन रांके - द थिअरी अँड पॅक्टिस ऑफ हिस्टरी ( ३ ) हिरोडोटस - द हिस्टरिज् ( ४ ) कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड उत्तर :- चुकीची जोड :- कार्ल मार्क्स - डिस्कोर्स ऑन द मेथड दुरुस्त केलेली जोड :- कार...